इलेक्ट्रीक दुकानाला शॉर्टसर्किटने आग -तरडगाव येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 13:28 IST2018-09-18T13:22:29+5:302018-09-18T13:28:30+5:30
फलटण तालुक्यातील तरडगाव येथील एका इलेक्ट्रीक दुकानाला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दुकानातील मोबाईलसह इलेक्ट्रीक साहित्य जळून खाक झाले. पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.

इलेक्ट्रीक दुकानाला शॉर्टसर्किटने आग -तरडगाव येथील घटना
तरडगाव (सातारा) : फलटण तालुक्यातील तरडगाव येथील एका इलेक्ट्रीक दुकानाला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दुकानातील मोबाईलसह इलेक्ट्रीकसाहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याच अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सतीश सुरेश पवार यांचे गावातील राममंदिराशेजारी असलेल्या व्यापारी गाळ्यात इलेक्ट्रीकचे दुकान आहे. सतीश पवारसोमवारी रात्री नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी केले. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानातून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले.
परिसरातील नागरिकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तातडीनेघटनास्थळी धाव घेतली. दुकान आग लागल्याचे समोेर येतान नागरिकांनी तातडीनेआग विझविण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तासांनंतर आग अटोक्यात आली.आगीत पाच टीव्ही, दुरूस्तीला आलेले मोबाईल, पंखे, लॅपटॉप व इतरइलेक्ट्रीक साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Attachments area